जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा ।
भक्तगण उद्धरी देऊन सिद्ध करा ॥ धृ ॥
मच्छिंद्र गोरख तेसे जालिदर्नाथ ।
कानिफ गहिनीनाथ नागेशसहित ।
चर्पटी भर्तरी रेवन मिळुनी नवनाथ ।
नवम नारायण अवतार संत ॥ जय ॥ १ ॥
भक्तिशक्ती बोधावेरायहित ।
तापत्रय ते हरिती स्मपकचित ।
नमने चरित्र पठणें दुरितांचा अंत ।
भक्तजनासी तरी नवनाथ खचित ॥ जय ॥ २ ॥
इहपर साधुनी देती समस्त नवनाथ ।
भूत समंधा प्रेत घालविती सत्य ।
भक्तजनांचे पुरवा तुहीच संकल्प ।
कृपार्थ होता दावा सदानंदरूप ॥ जय ॥ ३ ॥
दुःखी दीन दरिद्री लोकांना तारा ।
देजनी सुख संपत्ती मुक्तिदोही करा ।
स्मरण करावे आता नित्य नित्यानाथ ।
शरणागत मी तुमच्या पायी मम माथा ॥ जय ॥ ४ ॥
नवनाथाचा आधार सकलांना आता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ।
ब्रह्म सनातन शांती देई मम चिता ।
शरण विनायक लोटांगण आता ॥ जय ॥ ५ ॥
या संकेतस्थळावर लवकरच विविध आरत्या उपलब्ध करण्यात येतील.
कृपया थोड्या दिवसांनी पुन्हा भेट द्या.
आपले सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏